Sambhajinagar News : डिसेंबरमध्ये मिळेल २०० एमएलडी पाणी, संभाजीनगरवासीयांना मुख्यमंत्र्यांची ग्वाही File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : डिसेंबरमध्ये मिळेल २०० एमएलडी पाणी, संभाजीनगरवासीयांना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

फारोळ्यात २६ एमएलडीचे जलपूजन

पुढारी वृत्तसेवा

200 MLD water will be available in December, Chief Minister assures Sambhaji Nagar residents np88

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरासाठी नव्याने टाकण्यात येत असलेल्या २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या पहिल्या टप्प्यातून येत्या डिसेंबरमध्ये शहराला २०० एमएलडी पाणी मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी (दि. २३) फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील नव्या २६ एमएलडी योजनेच्या जलपूजनावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संदीपान भुमरे, भागवत कराड, कल्याण काळे, प्रदीप जयस्वाल, नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त श्रीकांत माजीप्रचार, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, जीव्हीपीआरचे संचालक शिवा रेड्डी, श्रीहरीचे सचिन मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराच्या जून्या ५६ एमएलडी योजनेचे पुनरुज्जीवन करून राज्य शासनाने ९०० मि.मी. व्यासाची नवीन ७५ एमएलडीची योजना शहरासाठी मंजूर केली होती.

या योजनेतून शहराला वाढीव २६ एमएलडी पाणीपुरवठा नुकताच सुरू केला आहे. शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते याच योजनेचे फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात जलपूजन करण्यात आले. यावेळी नव्या मुख्य २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर ते म्हणाले, शहराच्या पुढील ३० वर्षाच्या पाणीचा विचार करून ही योजना मंजर केली आहे.

या योजनेत ८२२ कोटी रुपयांचा स्वहिस्सा टाकण्यासाठी महापालिकेकडे निधी नव्हता. परंतु, शासनाने तो हुडकोद्वारे कर्जस्वरुपात उपलब्ध करून दिला आहे. येत्या महिन्यात हा निधी मिळेल, असेही ते म्हणाले, दरम्यान या योजनेचा पहिला टप्पा ऑक्टोबरअखेर सुरू करून शहराला २०० मिमी. पाणी देण्याचे आदेश यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. मात्र, फारोळ्यातील जलपूजनावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ही डेडलाईन दोन महिन्यांनी पुढे केली आहे.

योजना मार्चमध्ये पूर्ण करा

शहराच्या मुख्य २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या कामाची सविस्तर माहिती एमजेपीच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादर केला. ९० टक्के काम पूर्ण झाले असून जॅकवेलमध्ये पंप बसवण्याचे काम सुरू आहे. नवीन पंप हाऊसचे देखील काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर संपूर्ण योजनेचे काम मार्चमध्ये पूर्ण करून ३९४ एमएलडी पाणी द्या. त्यापूर्वी २०० एमएलडी डिसेंबरपासून शहराला द्या, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यासपीठावरून महापालिका प्रशासक, एमजेपीच्या मुख्य अभियंत्या आणि कंत्राटदार जीव्हीपीआरला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT