दिवाळी, छटपूजेनिमित्त १६३ विशेष रेल्वे  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Special Trains : दिवाळी, छटपूजेनिमित्त १६३ विशेष रेल्वे

गर्दी व्यवस्थापनासाठी रेल्वे विभाग सज्ज

पुढारी वृत्तसेवा

163 special trains on the occasion of Diwali, Chhath Puja

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नांदेड विभागात दिवाळी आणि छटपूजेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन या विभागातील विविध मार्गांवर १६३ विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गर्दीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी व्यापक उपाययोजना केल्या असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी २२ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर स्थानकावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

विशेष रेल्वे सेवा

१६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी मुख्य स्थानकांवर ६ अतिरिक्त तिकीट काऊंटर आणि ७१ एटीव्हीएम (ATVM) सहाय्यक नेमण्यात आले आहेत. नांदेड विभागात १६३ विशेष गाड्या चालवल्या जात असून, हे मागील वर्षीपेक्षा ५० गाड्यांनी अधिक आहे. या गाड्या पुणे, मुंबई, साईनगर शिर्डी, छपरा, प्रयागराज, वाराणसी, उदना, सूरत, दिल्ली, आग्रा, ग्वालियर, मथुरा, जयपूर, अजमेर, उज्जैन, रतलाम, चित्तौडगड, सावई माधोपुर, भिलवाडा, धर्मावरम, बिकानेर, कोटा, तिरुपती, सिकंदराबाद, विजयवाडा, राजमुंद्री, सामलकोट, अन्नावरम, कोयंबतूर, तिरुचनूर आदी मार्गावर सुरू आहेत.

२ डब्यांची वाढ

या आर्थिक वर्षात विभागाने ९८९ डबे वाढवले असून, हे मागील वर्षाच्या तुलनेत ९० टक्के अधिक आहे. पनवेल, पुणे, औरंगाबाद एक्सप्रेस, मनमाड पॅसेंजर, परळी-पूर्णा, अकोला पॅसेंजर, अम्ब-अंदोरा एक्सप्रेस, सन्ट्रागाची, पाटणा, छपरा, निजामुद्दीन एक्सप्रेस, आदिलाबाद पॅसेंजर, तिरुपती, रायचूर एक्सप्रेस आदी गाड्यांमध्ये २ ते ५ डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्यात आली असल्याचीही माहिती कामले यांनी दिली.

रेल्वेस्थानकाची पाहणी

या दौऱ्या दरम्यान कामले यांनी येथील रेल्-वेस्थानकाची पाहणी केली. पिटलाईन, नवीन इमारत यांचीही पाहणी केली. यावेळी त्यानी संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रवासी सोयींच्या दर्जाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT