Sambhajinagar News : काम २ वर्षांपूर्वी झाले, देयकही दिली अन् आता एमबी तपासताय file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : काम २ वर्षांपूर्वी झाले, देयकही दिली अन् आता एमबी तपासताय

सा. बां. चा साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रकार, घाटी देखभाल दुरुस्ती प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

14 crore spent on maintenance and repair of the main building of Ghati Hospital in two and a half years

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घाटी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या देखभाला दुरुस्तीवर अडीच वर्षांत १४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला, परंतु अजूनही डागडुजीचे काम जैसे थेच असून, आतापर्यंत १० कोटींची देयके कंत्राटदार एजन्सीला अदा करण्यात आली अन् आता पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी केल्यानंतर कामाच्या चौकशीचे देखावे करीत कुठे किती कामे झाली, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मेजरमेंट बुक (एमबी) तपासण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच वादग्रस्त कामांमुळे चर्चेत असतो. घाटीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावरूनही हा विभाग चर्चेत आला आहे. अडीच ते तीन वर्षांपूर्वी शासन निधीतून घाटी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील विविध दुरुस्तीची कामे करण्यासाठी कंत्राटदार एजन्सी नियुक्त करण्यात आली. मात्र या एजन्सीने काम करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे घाटी प्रशासनाकडून सतत ओरड केली गेली. गेल्या महिन्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घाटीतील कामांची पाहणी केली असता त्यावेळी त्यांनी देखभाल दुरुस्तीसाठी ३ वर्षांत मंजूर निधी व त्यातून न करताच विभागाने कंत्राटदाराला देयके अदा केली का, असा सवाल उपस्थित होत आहे.

कंत्राटदारावर कोणाची मेहरबाणी ?

घाटीतील देखभाल दुरुस्तीची अनेक कामे न करताच कंत्राटदाराने बिल उचलल्याची ओरड झाली आहे. दोन वर्षांत तब्बल १४ कोटींचा खर्च झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे. सध्या १० कोटींच्या कामांची देयके सापडली आहेत. त्यात काही कामे न करताच देयके अदा झाल्याचा प्रकार चौकशीत पुढे आला आहे. मात्र असे असतानाही कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले नाही.

सध्या एमबी तपासतोय घाटीतील डागडुजीची कोणकोणती कामे ● पूर्ण झाली, याबाबत एमबी तपासण्याचे काम करीत आहोत. आतापर्यंत १० कोटींच्या कामांच्या एमबी सापडल्या आहेत. त्याची तपासणी केली जात आहे.
- एस.एस. भगत, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT