12th Exam Result : बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी ? file photo
छत्रपती संभाजीनगर

12th Exam Result : बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी ?

उत्सुकता शिगेला; ५ मेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

12th exam results on Tuesday?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य मंडळाच्या फेब्रुवारी निकाल येत्या मंगळवारी (दि.५) जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व नऊ विभागीय मंडळांतील उत्तरपत्रिकांची तपासणी आणि निकाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

पुढील तीन दिवस सुट्या असल्याने हा निकाल सोमवारी किंवा मंगळव-ारी जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने यंदा १० फेब्रुव ारीपासून ४ मार्चपर्यंत बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून इयत्ता बारावी परीक्षेलाही सुमारे पावणे दोन लाख परिक्षार्थीनी अर्ज भरलेले होते.

या परीक्षा शांतेत पार पडल्यावर लगेचच उत्तरपत्रिका तपासणीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर प्रत्यक्ष निकाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित विभागीय मंडळातही हे काम गुरुवार, दि. ३० एप्रिलपर्यंत पूर्ण झाले. त्यामुळे आता प्रत्यक्ष निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. याआधी मंडळाने २७ एप्रिल रोजी निकाल जाहीर करण्याचे नियोजन केले होते.

परंतु बोर्डातील कर्मचाऱ्यांचा संप आणि इतर कारणांमुळे या मुदतीत निकाल जाहीर होऊ शकला नाही. मात्र, आता संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. परंतु शुक्रवार ते रविवार दरम्यान सलग तीन दिवस शासकीय सुट्टया आहेत. त्यामुळे हा निकाल सोमवारी किंवा मंगळवारी जाहीर होऊ शकतो, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दहावीची उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण

इयत्ता दहावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणीही पूर्ण झाली आहे. सध्या निकालाची पुढील प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे दहावीच्या निकालाला आणखी काही दिवसांचा अवधी लागू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT