मराठवाड्यात १२ लाख - ग्राहकांना बसवले स्मार्ट मीटर file photo
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात १२ लाख - ग्राहकांना बसवले स्मार्ट मीटर

टीओडी मीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये सवलत

पुढारी वृत्तसेवा

12 lakh smart meters installed for customers in Marathwada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी अर्थात टाईम ऑफ डे मीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये सवलत देण्यात येत आहे.

या सवलतीचा लाभग्राहकांना मिळत असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात येत आहे. मराठवाड्यात सुमारे १२ लाख १७ हजार २२८ ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.

नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक रीडिंग होत असल्याने अचूक बिले मिळतात. घरातील विजेचा वापर दर एक तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येतो. त्यामुळे वीज वापरावरही ग्राहकांचे थेट नियंत्रण राहणार आहे.

टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औधोगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. रीडिंग स्वयंचलित असल्याने मानवी हस्तक्षेप राहणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT