छत्रपती संभाजीनगर

ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 | वय थकले नाही, लोकशाही थकली नाही! ११८ वर्षांच्या आजोबांचे मतदान

११८ वर्षांचे वय असूनही त्यांनी दाखवलेली जागरूकता व कर्तव्यभावना ही समाजासाठी प्रेरणादायी

पुढारी वृत्तसेवा

सुलतानपूर: खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथील ११८ वर्षांचे शंकर महादू श्रीखंडे आजोबा यांनी  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीप्रती असलेली निष्ठा अधोरेखित केली.

वयाची शंभरी ओलांडूनही आजोबांनी मतदान केंद्रावर स्वतः उपस्थित राहून मतदान केले. त्यांच्या या कृतीमुळे मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आजोबांचे मतदान पाहून अनेक तरुण व नवमतदारांनी प्रेरणा घेतली.

“मतदान हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र अधिकार आणि कर्तव्य आहे,” असा मोलाचा संदेश शंकर महादू श्रीखंडे आजोबांनी यावेळी दिला. त्यांच्या या कृतीमुळे लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित झाले असून मतदानाबाबत जनजागृतीस चालना मिळाली आहे. ११८ वर्षांचे वय असूनही त्यांनी दाखवलेली जागरूकता व कर्तव्यभावना ही समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, ग्रामस्थांसह प्रशासनाकडूनही त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT