Sambhajinagar ZP Result 2026 LIVE pudhari photo
मराठवाडा

Sambhajinagar ZP Result 2026 LIVE: शिवसेना आपला बालेकिल्ला राखणार की भाजप मुसंडी मारणार?

Marathwada ZP Election Result: शिवसेनेचा कोणता गट सत्तेच्या किती जवळ जाणार? मराठवाड्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला

Anirudha Sankpal

Sambhajinagar ZP Result 2026 LIVE:

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, लातूर, धाराशीव आणि परभणी या जिल्ह्यातील जिल्हापरिषद निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. या चार जिल्ह्यात साधारणपणे ६२ ते ६६ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झालं आहे. २०१७ नंतर जवळपास एका दशकानंतर या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी मतदान होत आहे.

दरम्यान, या काळात बराच राजकीय राडा झाला असून शिवसेना आणि राष्टवादी काँग्रेसची दोन शकले झाली आहेत. मराठवाड्यात अनेक राजकीय घडामोडी झाल्या असून मोठी आंदोलने देखील उभी राहिली आहेत. त्यामुळं यंदा या चार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेवर कोणचा झेंडा फडकणार याबाबत मोठी उत्सुकता आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरे विरूद्ध शिंदे गट असा थेट सामना असला तरी भाजप देखील जोरदार मुसंडी मारू शकतं. महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण ते पाहिलं आहे. लातूरबाबत बोलायचं झालं तर महापालिकेचा जलवा जिल्हा परिषदेत देखील कामय ठेवून देशमुख घारणं भाजपकडून सत्ता खेचून आणणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर धाराशीवमध्ये ओमराजे निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

मराठवाड्यात कोणाची प्रतिष्ठा पणाला?

१. जिल्हा परिषदेतील जागा आणि उमेदवार

  • छत्रपती संभाजीनगर: ६२ जागा (२१७ उमेदवार)

  • धाराशीव: ५४ जागा (१८६ उमेदवार)

  • लातूर: ५८ जागा (१९४ उमेदवार)

  • परभणी: ५४ जागा (१७९ उमेदवार)

२. पंचायत समितीमधील जागा आणि उमेदवार

  • छत्रपती संभाजीनगर: १२४ जागा (३९८ उमेदवार)

  • धाराशीव: १०८ जागा (३५५ उमेदवार)

  • लातूर: ११६ जागा (३७२ उमेदवार)

  • परभणी: १०८ जागा (३४२ उमेदवार)

३. कोणाची प्रतिष्ठा पणाला?

मराठवाड्यातील या चारही जिल्ह्यांत महायुतील भाजप, शिवसेना-शिंदे, राष्ट्रवादी-अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना-ठाकरे, राष्ट्रवादी-शरद पवार अशी थेट लढत आहे.

संभाजीनगर: संदीपान भुमरे (शिवसेना) आणि अंबादास दानवे (ठाकरे गट) यांच्यातील वर्चस्वाची लढाई.

लातूर: विलासराव देशमुख वारसा (काँग्रेस) विरुद्ध भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर.

धाराशीव: ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट) विरुद्ध तानाजी सावंत (शिवसेना) यांची प्रतिष्ठा.

परभणी: संजय जाधव (ठाकरे गट) विरुद्ध महायुतीचे स्थानिक नेते.

४. गेल्या निवडणुकीचे (२०१७) सरासरी संख्याबळ

  • लातूर: भाजपचे वर्चस्व होते (३६ जागा)

  • परभणी: राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा प्रभाव होता.

  • धाराशीव: शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस होती.

  • संभाजीनगर: शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता (१८ जागा).

SCROLL FOR NEXT