मराठवाडा

तेलंगणाचे आमदार टी. राजा यांच्या विरोधात लातूरात गुन्हा

backup backup

लातूर; पुढारी वृतसेवा : तेलंगणाचे आमदार टी. राजासिंग (टी.राजा) यांच्याविरुद्ध येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅली समारोपात मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपाहार्य वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी येथे शहरातून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत आमदार टी. राजा यांचा समावेश होता. या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर आ.टी. राजा यांनी भाषण केले होते. यामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपाहार्य विधाने केली होती. त्यानंतर पोलिसांनी या भाषणाबाबत सरकारी विधिज्ञांचा अभिप्राय मागवला होता. भाषणातून गुन्हा झाल्याचे दिसून येत आहे असा अभिप्राय २७ फेब्रुवारीस प्राप्त झाला. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मणराव निळखंठे यांच्या फिर्यादीवरुन आ. टी. राजा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT