मराठवाडा

नांदेड : हाणेगाव, भुतनहिप्परगा येथे नाकाबंदी

अविनाश सुतार

हाणेगाव पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व कर्नाटक, तेलंगणा मरखेल पोलिसांकडून नाकाबंदी सुरु आहे. देगलूर तालुक्यातील हाणेगाव व भुतनहिप्परगा या दोन ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू केली आहे. वाहनांची काटकोरपणे तपासणी करण्यात येत आहे.

कर्नाटक २०२३ सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे. हाणेगाव पासून ५ ते ६ किलोमीटरवर कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या सीमा आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी हाणेगाव व भुतनहिप्परगा, माळेगाव, वझर शिळवणी, देगलूर ते औराद मार्गे जावे लागते. मरखेल पोलिस स्टेशन हद्दीतील हाणेगाव, मरखेल या विभागाला दोन राज्याची सीमा जोडल्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे पोलिसांनी येथे वाहनांची दिवसरात्र काटेकोरपणे तपासणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

मरखेल पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार नारायण यंगाले, लोखंडे राजू, सिरसाठ मेजर, केंद्र मेजर या पथकाने हाणेगाव सीमेवर नाकाबंदी केली आहे. येत्या १२ मेपर्यंत नाकाबंदी सुरु राहणार आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT