बीड

बीड : नारायणगडमधील ८ जूनची ‘मराठा महासभा’ पुढे ढकलली

रणजित गायकवाड

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : बीडच्या नारायणगड येथे ८ जून रोजी होणारी महासभा पुढे ढकलली आहे. महासभा जरी पुढे ढकलली असली तर मराठा आरक्षणाच्या मागण्यांच्या अनुषंगाने अंतरवाली सराटी येथे ४ जूनपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायणगड येथे ८ जून रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. ही महासभा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार होती. पण तिव्र उष्णता आणि पाण्याच्या अभावामुळे ही महासभा पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

'महासभा होणारच आहे. लवकरच मनोज जरांगे हे मराठा समाज बांधवांशी चर्चा करून पुढील तारीख निश्चित करेन. मात्र, ८ जून रोजी होणारी विराट महासभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभेची पुढील तारीख सर्वांना कळवण्यात येईल. याची सकल मराठा बांधवांनी नोंद घ्यावी,' असे आवाहन जरांगे यांच्या निकटवर्ती सहकार्यांकडून करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT