धारूर : धारूर पोलिस ठाणे हद्दीतील एका गावातील तरूणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर अत्याचार केला. पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून धारूर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दिनेश आसाराम सावंत (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करून गुरूवारी (दि.३) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
धारूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला दिनेश सांवत याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर लॉजवर नेऊन अत्याचार केला. तसेच तिचे अश्लिल फोटो काढून ते फोटो तिच्या भावाच्या मोबाईलवर पाठवून तु आमचे लग्न लावून दे नाहीतर मी तुमचे वाटोळे करेन अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांसह पोलिस ठाण्यात धाव घेत सावंत याच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याची दखल घेत धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी दिनेश सावंत याला गुरूवारी (दि.३) अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सात जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.