Pudhari
बीड

Beed Accident | टायर डोक्यावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू : संतप्त जमावाचा ट्रॅक्टरची तोडफोड करण्याचा प्रयत्न

माजलगाव शहराजवळील चिंचगव्हाण महामार्गावर अपघात

पुढारी वृत्तसेवा

Mazalgaon Chinchgavhan road Accident

माजलगाव: माजलगाव येथील इंदिरानगर भागातील १६ वर्षीय अहात खान आजहर खान पठाण याचा चिंचगव्हाण रोडवर अपघाती मृत्यू झाला. अहात खान हा गॅरेजचे काम पूर्ण करून घरी परत येत असताना ट्रॅक्टरच्या टायरखाली आल्याने जागीच ठार झाला. अपघात इतका गंभीर होता की, ट्रॅक्टरचा टायर डोक्यावरून गेल्याने त्याचा मेंदू बाहेर आला. हा दुर्दैवी प्रकार सायंकाळी सुमारे ७ वाजता घडला.

घटनेनंतर अपघातस्थळी मोठा जमाव तयार झाला. काही लोकांनी ट्रॅक्टर तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी जमाव नियंत्रणात आणण्यासाठी मोठा प्रयत्न केला, अन्यथा ट्रॅक्टर जाळून टाकला असता.

माजलगाव शहराजवळील चिंचगव्हाणसमोर राष्ट्रीय महामार्गावर उसाने भरलेला ट्रॅक्टर कारखान्याकडे जात होता. अहात खान आपल्या मोटरसायकलवरून घरी येत असताना ट्रॅक्टर आणि त्याच्या ट्रॉलीच्या पाठीमागील चाकाखाली आल्यामुळे हा अपघात झाला. ट्रॅक्टर चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण अपघात टाळता आला नाही.

पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ घटनास्थळी दाखल झाले आणि जमाव शांत करण्याचे प्रयत्न केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. अहात खानच्या अपघाती मृत्यूमुळे इंदिरानगर परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT