गेवराई : तालुक्यातील ठाकर आडगाव येथे दारू पिऊन घरात घुसलेल्या चौघांनी घरातील महिलेचा विनयभंग करत बेदम मारहाण केली. घरातील साहित्य व भांड्यांचीही नासधूस करत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा संताप जनक प्रकार घडला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२२) सायंकाळी ८ च्या सुमारास घडली. याप्रकरणी तलवाडा पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील तक्रारदार महिला आपल्या सुनेसह घरात असताना मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास संदिपान अरुण कोकाट, शिवराज गंगाधर कोकाट, अरुण सखाराम कोकाट आणि मधुकर मुरलीधर कोकाट (सर्व राहणार ठाकर आडगाव) हे तेथे मद्यप्राशन करून आले. व त्यांनी सासू-सुनांना शिवीगाळ केली. त्यानंतर संदिपान कोकाट याने तक्रारदार महिलेचा विनयभंग करून त्यांना मारहाण केली.