Sunetra Pawar : पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रगतीची नवी पायाभरणी ठरेल file photo
बीड

Sunetra Pawar : पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रगतीची नवी पायाभरणी ठरेल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन; पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

Veterinary College will be a new foundation for progress

परळी, पुढारी वृत्तसेवा मराठवाडा ही संतांची संस्कृतीची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. शेतीला आधार देणाऱ्या पशुधनाची काळजी घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. परळीत उभे राहणारे हे महाविद्यालय मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाच्या पशुवैद्यकीय शिक्षणाचे मोठे केंद्र ठरेल. या दृष्टीने मराठवाड्याच्या प्रगतीची ही नवी पायाभरणी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी केले. समृद्ध शेतकरी, सुदृढ पशुपालन आणि पशुसंवर्धनातून स्वावलंबी उद्योजक युवक घडणार असून त्या दृष्टिकोनातून शासन प्रयत्नशील असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या दूरदृष्टीतून निर्माण होत असलेल्या परळी वैजनाथ येथील ६३४ कोटी रुपये खर्चाच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ व भूमिपूजनाचा शानदार सोहळा आज मोठ्या थाटात संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रचंड जनसागराच्या उपस्थित व उत्साहपूर्ण वातावरणात पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते व पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हे भूमिपूजन पार पडले. करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, आ. नमिता मुंदडा, माजी आमदार संजय दौंड, बदामराव पंडित, नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी, पशु वैद्यक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अक्षय मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सांगितले की, बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे जे स्वप्न अजितदादांनी बघितले हे पूर्णत्वास घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.

मराठवाडा हा कष्टकऱ्यांचा प्रदेश आहे, शेतीला आधार देणाऱ्या पशुधनाची काळजी घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. परळीत उभे राहणारे हे महाविद्यालय मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाच्या पशुवैद्यकीय शिक्षणाचे मोठे केंद्र ठरेल. तर बारामती येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला अजितदादा पवार यांचे तर परळीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नाव द्यावे अशी मागणी आ. धनंजय मुंडे यांनी केली. कार्यक्रमास मतदारसंघातील नागरिक, महिला तसेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, बारामती येथील कृषी प्रदर्शनात अजितदादांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून परळी परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासात्मक व सकारात्मक बदल घडणार आहेत. पशुपालकांना त्यांच्या व्यवसायासाठी मदत व्हावी यासाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची शासनाची भूमिका आहे. पशुसंवर्धन खात्याची मंत्री म्हणून परळी व परिसरासाठी येणाऱ्या पिढ्यांचे उज्वल भविष्य घडावे या दृष्टिको-नातून आपल्याला काहीतरी करता येत असल्याचा मनोमन प्रचंड आनंद असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मुख्यमंत्री पशुधन उद्योग योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT