Beed News : नारायणगडाच्या मेळाव्यासाठी वीस कोटी आले; जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांचा आरोप file photo
बीड

Beed News : नारायणगडाच्या मेळाव्यासाठी वीस कोटी आले; जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांचा आरोप

गंगाधर काळकुटे, हनुमान मुळीक यांच्याकडे पाठविल्याचा केला गौप्यस्फोट !

पुढारी वृत्तसेवा

Twenty crores came for the Narayangad gathering; Allegation of district head Swapneel Galdhar

बीड, पुढारी वृत्तसेवा : येत्या दसऱ्याच्या दिवशी शिरूर तालुक्यातील नारायण गड येथे होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यासाठी वीस कोटी रुपये आपल्याकडे आले होते मात्र आपण ते पैसे मनोज जरांगे यांचे लाभार्थी गंगाधर काळकुटे तसेच हनुमान मुळीक यांच्यासह अन्य इतरांकडे दिल्याचा त्यांनी गौप्यस्फोट केल्याने या मेळाव्याबद्दल आता चर्चेला उधाण आले आहे.

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्याबद्दल सध्या दररोज नवनवीन खुलासे समोर येत त्यांच्यावर चारित्र्य हनन, मनी लॉडरिंग, तसेच गुंडागर्दीचे यापूर्वी आरोप करण्यात आले असून आज यात आणखीन एक भर टाकणार आरोप त्यांच्या जवळील परंतु आता त्यांच्यापासून दूर गेलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी गौप्यस्फोट करताना या दसऱ्या मेळाव्यासाठी आपल्या कडे 20 कोटी रुपये आले होते परंतु आपण ते न स्वीकारता ते मनोज जरांगे यांची पिलावळ गंगाधर काळकुटे, हनुमान मुळीक यांच्यासह अन्य दोन जणांकडे पाठविले आहे.

दरम्यान कालच स्वप्नील गलधर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी या मेळाव्यातून काही अपशब्द बोलण्यातून आल्यास बीडमध्ये आपल्याशी गाठ असल्याचा इशारा थेट मनोज जरांगे यांना दिला होता, एक तर हा मेळावाच रद्द करण्याची त्यांनी मागणी केली असून ही मागणी करताना जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे संकट आहे, या संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची गरज असताना विनाकारण करोडो रुपयांचा अनावश्यक खर्च टाळून हेच पैसे यंदूषकळसाठी वाटप करावे अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र त्यावर मनोज जरांगे यांच्या वतीने त्यांच्या टीम मधून हा मेळावा होणारच असे जाहीर करण्यात आले.

एवढेच नाही तर या मेळाव्यासाठी गावोगावी फिरून लोकाना तांदळाच्या अक्षता वाटण्यात येत असल्याचा गंभीर आरोप अंतरवली सराटी येथील रेखा कोंडे या महिलेने समाज माध्यमावरून केले आहेत. त्यामुळे या मेळाव्या बाबत उत्सुकते बरोबरच आरोपंच अजून किती धुरळा उडणार याबाबत सध्या चर्चेला उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT