केज:- केज शहरातील भवानी चौकात दांगट यांच्या पेट्रोल पंपांत धारूर कडून येणारा एक पेंडीने भरलेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून घुसला आणि पेट्रोल पंपात उभ्या असलेल्या एका टँकर व दोन मालवाहू टेम्पोला धडकला. मात्र सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नाही.
दि. ९ मे रोजी रात्री २:०० च्या सुमारास माजलगावहून सांगलीकडे सरकी पेंड घेऊन जात असलेला ट्रक क्र. (एम एच५०/ सी ३५७६) धारूर रोडवरील जयभवानी चौकात असलेल्या पशुपतीनाथ दांगट यांच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपात जाऊन पलटी झाला.
या अपतात इंधनाचे उभे असलेले टँकर क्र. (एम एच- ४४/९३०३) आणि उभे असलेले मालवाहू टेम्पो क्र.(एम एच-३८/ एक्स-३०५८) आणि (एम एच-१२/ के पी-९१६८) यांचे नुकसान झाले. मात्र रात्रीची वेळ असल्याने पेट्रोल पंपात माणसांची वर्दळ कमी असल्याने जीवित हानी टळली. सरकी पेंड वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ड्रायव्हर मधुकर माणिक कानगे (रा. तडवळा जिल्हा धाराशिव) हा किरकोळ जखमी झाला आहे.