Dharur Truck Accident : धारूर घाटात ट्रक दरीत कोसळला  File Photo
बीड

Dharur Truck Accident : धारूर घाटात ट्रक दरीत कोसळला

ट्रक धारूर घाटातून जात असताना धोकादायक वळणावर अपघातग्रस्त झाला.

पुढारी वृत्तसेवा

Truck falls into a valley in Dharur Ghat

धारूर, पुढारी वृत्तसेवा धारूर तालुक्यातील घाट परिसरात बुधवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली. अंबाजोगाई येथून संभाजीनगरकडे विटांची वाहतूक करणारा १२ टायर ट्रक (क्रमांक के ५६७२९२) धारूर घाटातून जात असताना धोकादायक वळणावर अपघातग्रस्त झाला.

बुधवारी सायंकाळी घडलेल्या या अपघातात चालक अजय लक्ष्मण आणि क्लीनर स्टीवन यांचा थोडक्यात जीव वाचला आहे. ट्रक दरीत कोसळण्यापूर्वी चालकाने प्रसंगावधान राखत उडी घेतली होती. दोघेही किरकोळ जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

अंधार असल्याने नागरिकांनी मोबाईलच्या प्रकाशाच्या मदतीने दरीत उतरून चालक आणि क्लीनरला वर काढले. त्यानंतर दोघांनाही धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. अपघात एवढा भीषण होता की ट्रकचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

दरीत कोसळताना ट्रकमधील विटा सर्वत्र विखुरल्या गेल्या असून मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. प्रशासनाकडे या ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना आणि मजबूत कठडे उभारण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी मालवाहू ट्रक दरीत कोसळण्याचे प्रकार सतत घडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT