गौतम बचुटे
केज : केज येथे एका ६२ वर्ष वयाच्या आडत व्यापाऱ्याने आजारास कंटाळून घराच्या तळमजल्यात लोखंडी आडूला दोरीने गळफास लावून जीवन संपविलेची घटना घडली आहे.
केज शहरातील नवामोंढा परिसरात प्रसिद्ध आडत व्यापारी राधेशाम श्रीराम तोष्णीवाल (वय ६२) यांची आडत व त्याठिकाणी राहते घर आहे. ते मागील काही दिवसापासून आजारी होते. आजारास कंटाळून राधेश्याम तोष्णिवाल यांनी टोकाची भूमिका घेत दि. १९ सप्टेंबर शुक्रवारी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास घराच्या तळमजल्यात लोखंडी आडूला दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे, जमादार दत्तात्रय बिक्कड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनात जमादार दत्तात्रय बिक्कड हे पुढील तपास करीत आहेत.