नर्तिकांच्या घुंगरांच्या तालावर... आ. धसांचा ढोल ! file photo
बीड

MLA Suresh Dhas Video: नर्तिकांच्या घुंगरांच्या तालावर... आ. धसांचा ढोल !

Walunj bhairavnath yatra: वाळुंज येथील यात्रेत रंगली ढोल-घुंगरांची जुगलबंदी; व्हिडिओ व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

MLA Suresh Dhas Video Walunj bhairavnath yatra

आष्टी (जि. बीड), पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील भैरवनाथाची यात्रा अभूतपूर्व उत्साहात पार पडली. अनेक वर्षांनंतर छबिना मिरवणुकीत २० ते २५ फडांतील नृत्यांगनांच्या तालाला चक्क आमदार सुरेश धस यांनी ढोलची साथ दिली. यावेळी आ. धसांचा ढोल आणि नृत्यांगनांच्या घुंगरांची चांगलीच जुगलबंदी रंगली होती. याचा वहिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाळुंज येथील भैरवनाथाची यात्रा ही चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी दरवर्षीप्रमाणे भरवली जाते. यात्रेत आष्टी तालुक्यासह शेजारील जिल्ह्यांमधूनही हजारो भाविकांनी वाळुंज येथे गर्दी केली होती. यात्रेची खास परंपरा असलेल्या संध्याकाळच्या छबिना मिरवणुकीत भैरवनाथाच्या पालखीसोबत नृत्यांगनांचे नृत्य सादर करण्याची जुनी परंपरा यावर्षी पुन्हा सुरू करण्यात आली. काही वर्षांपूर्वी ही प्रथा न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आली होती. मात्र गावकऱ्यांच्या आग्रहानंतर आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घेत ही परंपरा पुन्हा सुरू केली.

छबिना मिरवणुकीदरम्यान आमदार सुरेश धस यांनी स्वतः पारंपरिक ढोल वाजवत फडातील नृत्यांगनांच्या तालावर ताल धरत त्यांनीही नृत्य केले. एकीकडे वाद्यांचा गजर, तर दुसरीकडे घुंगरांची छमछम, असा सुरेल संगम यावेळी पाहावयास मिळाला. त्यांच्या सहभागामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला. स्वर्गीय रामचंद्र धस यांनी ही जपलेली ही परंपरा पुढे नेण्याचे काम आमदार धस हे करत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले, तर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन हे या यात्रेत झाल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. या सर्वांची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करण्याची मागणी आता समोर आली आहे.

३०० वर्षांची परंपरा : वाळुंज येथील भैरवनाथाची यात्रा किमान साडेतीनशे वर्षांपासूनची जुनी असून, या यात्रेत पूर्वी परिसरातील फडात काम करणाऱ्या नृत्यांगना या रात्रभर नृत्यसेवा करावयाच्या मात्र काही समाजकंटक यांनी या यात्रेत जाणीवपूर्वक गोंधळ घालून ही परंपरा खंडित केली होती. मात्र आ. धस यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून रात्रभर न भरवता न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ रात्री दहा वाजेपर्यंतच ठेवली आहे. बऱ्याच वर्षांनी या यात्रेत सर्व संमतीने तसेच पोलिसांच्या परवानगीने नृत्यांगना नाचल्या आहेत.
- सुरेश सातपुते, ग्रामस्थ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT