Tired of harassment, married woman ends life by jumping into well
बीड, पुढारी वृत्तसेवा
सासरी सततच्या होणाऱ्या छळाला कंटाळ न विवाहिते ने विहिरीत उडी पेऊन आत्महत्या केल्याची घटना आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथे दि. २८ मे रोजी घडली होती. या प्रकरणात ९ जून रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविता भाऊसाहेब विधाटे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सविताचे वडील काशिनाथ फसले (रा. दौलावडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अंभोरा पोलिस ठाण्यात भाऊसाहेब विधाटे, सासरा किसन विधाटे व सासु लिलाबाई विधाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता व भाऊसाहेब यांचा विवाह २००८ मध्ये झाला होता.
त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर काही काळ विधाटे यांनी सविताला चांगले नांदवले परंतु मुलांना दुध पिण्यासाठी माहेरहून गाय घेवून ये म्हणत त्रास द्यायला सुरुवात केली. यानंतर स्कुटीसाठी पैसे मागितले. यानंतर काही दिवसांनी सविताच्या नणदेला अहिल्यानगर येथे घर घ्यायचे असल्याने त्यासाठी पैशाची मागणी सविताच्या माहेरी केली जात होती.
यावेळी मात्र वडील काशिनाथ फ सले यांनी पैसे नसल्याने देऊ शकत फसले कुटुंबीयांनी स्वतःचे अहिल्यानगर येथील घर विकण्याची तयारी सुरू केली होती.
याला सविताने विरोध केला म्हणून पुन्हा त्रास सुरू झाला. शेवटी या त्रासाला कंटाळून दि.२८ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सविताने घरासमोरील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात. काशिनाथ फसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या प्रकरणाचा अधिक तपास आदिनाथ भडके हे करीत आहेत.