Gold Chain Thift from Cage Bus Station
केज बस स्थानकातून सोन्याची चैन लंपास Pudhari File photo
बीड

केज : बस स्थानकातून वृद्धांच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास!

गौतम बचुटे

केज, पुढारी वृत्तसेवा : गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन बस स्टँड वरून चोरटयाने लंपास केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.16) घडली. या बाबतची अधिक माहिती अशी की, लातूरमधील चंद्रकांत संतराम गुळवे (वय.68) हे रेणापूरकडे जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर थांबले होते. त्यावेळी दुपारी साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-अहमदपूर या गाडीत चढत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चैन पळवली. या प्रकरणी चंद्रकांत गुळवे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.

बस स्टँडमधील सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी

बस स्टँड आणि परिसरातील चोऱ्या, पाकीटमारी आणि महिलांचे दागिने चोरीच्या घटना यावर तिसऱ्या डोळ्याची नजर रहावी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु या बस स्थानकाचा जो भाग सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली येत नाही. त्या भागात अनेकवेळा चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे लावलेले कॅमेरे हे बिनकामी असल्याच्या भावना प्रवाशांमधून उमटत आहेत.

SCROLL FOR NEXT