चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.  Pudhari Photo
बीड

केज : शटर उचकटून चष्म्याच्या दुकानात चोरी

चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद

पुढारी वृत्तसेवा

केज : कळंब येथे आठवडी बाजार परिसरात असलेल्या चष्म्याच्या दुकानाचे शटर उचकटून काऊंटरमध्ये ठेवलेले रोख १५ हजार रुपये आणि चष्मे असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला आहे. चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज येथील विष्णू लांडगे व सचिन मस्के या दोघांचे भागीदारीमध्ये कळंब (जि.धाराशिव) येथील आठवडी बाजारात चष्म्याचे दुकान आहे. दि. २१ मार्च रोजी ते सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास नेहमी प्रमाणे दुकान बंद करून केज येथे घरी गेले. त्यानंतर ते दुसऱ्यादिवशी दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाचे एक शटर उचकटलेले दिसले. त्यांनी दुकान उघडू पाहिले असता ड्रॉवरमध्ये ठेवलेले नगदी १५ हजार रुपये आणि चष्म्याच्या फ्रेम चोरी झाले असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याच्या जवळील टॉर्चच्या प्रकाशात दुकानातील ड्रॉवर आणि सामान शोधत असताना दिसून येत आहे. या प्रकरणी विष्णू लांडगे यांनी कळंब पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक रवि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT