Beed News : पाण्याच्या शोधात हरणांची भटकंती file photo
बीड

Beed News : पाण्याच्या शोधात हरणांची भटकंती

वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; पाणवठ्यांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

The wandering of deer in search of water

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा: परळी वैजनाथ परिसरातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र हनुमान गड परिसरात समोर आले आहे. पाण्याच्या शोधात असलेली दोन हरणे या भागात आढळून आल्याने वन्यप्राण्यांसाठी पाण्याच्या उपलब्धतेचा आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वनक्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोत असताना वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती त्यांच्या आटत अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकते. हनुमान गड परिसरात दोन हरणे पाण्याच्या शोधात आढळल्याने वन विभागाकडून वन्यजीवांसाठी पुरेशा पाणवठ्यांची व्यवस्था केली जाते का, तसेच उपलब्ध पाणवठ्यांची नियमित देखभाल होते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीच्या जवळ येण्याची शक्यता असते. अशा वेळी वाहनांची वर्दळ, भटक्या कुत्र्यांचे हल्ले किंवा अन्य मानवी हस्तक्षेपामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी वनक्षेत्रातच पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. हनुमान गड परिसरातील या घटनेची वन विभागाने गांभीर्याने दखल घेऊन पाणवठ्यांची पाहणी करावी, आवश्यक त्या ठिकाणी कृत्रिम पाणवठे निर्माण करावेत आणि त्यामध्ये नियमित पाणी उपलब्ध राहील, याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वन्यजीवांच्या तहानेची दखल घेण्यासाठी व हनुमान गड परिसरात दिसलेली दोन हरणे याबाबत वन अधिकार्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी ते उपलब्ध होवू शकले नाही. मात्र वन्यजीवांच्या पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT