लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाची दुचाकी पळवल्याची घटना केजमध्ये घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.16) घडली. या दुचाकी चोरीच्या घटनेमध्ये दोन अज्ञात चोरांचा हात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
केज येथील केज-बीड रस्त्यालगतच्या रमाई नगर येथे राहत असलेले बापू मोहन बचुटे हे त्यांच्या मुलीला बीड येथे दवाखान्यात तपासणी करता गेले होते. यावेळी ते आवरून येताना रात्री 10:00 च्या सुमारास केज येथे परत आले. यानंतर त्यांनी काळ्या रंगाची दुचाकी क्र. (एम एच-४४ एबी-३८३१) उभी केली. बापू बचुटे हे मोटार सायकलला चावी तशीच ठेवून लघु शंकेसाठी बाजूला गेले. ती संधी साधून दोन अज्ञात चोरट्याने मोटार सायकल सुरू करून धूम ठोकली. त्या नंतर बापू बचुटे यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मोटार सायकलचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही. त्या नंतर बापू बचुटे यांच्या तक्रारी वरून अज्ञात दोघा मोटार सायकल चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस जमादार श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.