सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गरजू घटकांना प्रामुख्याने सामावून घ्यावे file photo
बीड

Beed News : सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गरजू घटकांना प्रामुख्याने सामावून घ्यावे

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे प्रतिपादन; नवदाम्पत्यांना मिळणार २५ हजारांचे अनुदान

पुढारी वृत्तसेवा

The needy elements should be primarily accommodated in the mass marriage ceremony

बीड, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात दि.१४, १५, ३० आणि ३१ डिसेंबर २०२६ रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे जिल्हा प्रशासनाकडून आयोजन करण्यात आले आहे. यात लग्नातील अनावश्यक खर्च टाळून सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून नवदांपत्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तरी सामूहिक विवाह सोहळ्यात आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर आणि लग्नाचा खर्च पेलू न शकणाऱ्या गरजू कुटुंबांना प्रामुख्याने यात सामावून घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एफ. एम. शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कालिदास बडे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक केदार गरड यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले की, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महिला व बालविकास विभागामार्फत हे अनुदान दिले जाते.

या योजनेचा लाभ खऱ्या गरजू पर्यंत पोहोचविण्यासाठी समाज कल्याण आणि महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यावर भेटी देवून पुढील डिसेंबर महिन्यात विवाह करू इच्छिणाऱ्यांची माहिती संकलित करावी. या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच या उपक्रमाची गावागावात जनजागृती करण्याची जबाबदारी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

गावातील इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज जमा करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांनी प्राप्त झालेले अर्ज तातडीने बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे दाखल करावेत. हा जिल्हा प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असून, सर्व तालुक्यांमध्ये त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात येत्या १४, १५, ३० आणि ३१ डिसेंबर २०२६ रोजी हे सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहेत. यामध्ये इच्छुक असलेल्या नवदांपत्यांच्या प्राप्त अर्जाचे अवलोकनही त्यांनी यावेळी केले. तहसीलदार, गटविकास अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व गावामध्ये याची जनजागृती करावी. अशा सुचनाही केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT