बीड : बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींचे मृतदेह कर्नाटक सीमेवरील रस्त्यावर सापडल्याची माहिती अंजली दमानिया यांना एका व्यक्तीने व्हाईस मेसेज वरील पाठवली होती. परंतु या प्रकरणात आता पोलिसांनी तपास केला आहे. दमानियांना ज्या व्यक्तीने असा मेसेज केला होता तो व्यक्ती नशेमध्ये असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेविषयी कोणालाही माहिती असल्यास द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.