बीडमधील रुग्‍णालयाची कोसळलेली लिफ्ट, यातूनच मनोज जरांगे पाटील दुसर्‍या मजल्‍यावर जात होते.  Pudhari Photo
बीड

Manoj Jarange Patil | रुग्णालयाची लिफ्ट कोसळली : मनोज जरांगे पाटील यांना दरवाजा तोडून बाहेर काढले !

लिफ्ट अचानक कोसळली, मनोज जरांगे पाटील आणि सहकारी सुखरूप

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री :  मनोज जरांगे पाटील हे एका रुग्णाला भेटायला बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये आले होते. यावेळी लिफ्टने पहिल्या मजल्यावर जात असताना लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने लिफ्ट खाली आदळली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या लिफ्टमध्ये अडकलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले बीडमध्ये शिवाजीराव मेडिकल केअर नावाचं मोठं रुग्णालय आहे.

इथे एका रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील आले होते. संबंधित रुग्ण हा दुसऱ्या मजल्यावर दाखल होता. त्याला भेटण्यासाठी मनोज जरांगे हे दुसऱ्या मजल्यावर जात होते. पण पहिल्या मजल्यावर अचानक लिफ्ट बंद झाली आणि ती थेट खाली तळमजल्यावर जावून कोसळली. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारीदेखील लिफ्टमध्ये होते. सुदैवानं या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एका रुग्णाला भेटण्यासाठी बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये आले होते. या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील जात होते. मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह लिफ्टने पहिल्या मजल्यावर जाताच लिफ्ट अचानक बंद झाली, आणि ती पहिल्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर येऊन आदळली. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्या लिफ्टमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे काही सहकारी देखील होते, त्या सर्वांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले.

ओव्हरलोड झाल्याने घडली घटना

दरम्यान ही लिफ्ट ओव्हरलोड झाल्याने वर जाण्याऐवजी थेट खाली आली. क्षमतेपेक्षा जास्‍त लोक या लिफ्टमधून जात असल्‍याने हा अपघात झाल्‍याची माहीती समोर येत आहे. ओव्हरलोड झाल्‍यामुळे लीफ्ट थेट खाली कोसळली. त्‍यानंतर जरांगे पाटील व त्‍यांच्या सहकाऱ्यांना दरवाजाचे लॉक उघडून बाहेर काढण्यात आले. अशी माहिती रुग्‍णालयातून देण्यात आली.

रुग्‍णालयातील लिफ्टमधील सिसीटीव्ही फुटेज समोर आले आहे यामध्ये मनोज जरांगे दिसत आहेत.

रुग्णालयातील लिफ्टला परवानाच नव्हता

या अपघातानंतर रुग्णालयाकडून लिफ्टचा परवाना असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून सदरील लिफ्टला परवानगी नसल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात आपण लिफ्ट बंद करण्याच्या त्यांना सूचना दिल्या असून, इन्स्पेक्शन देखील केले जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक विद्युत निरीक्षक गणेश सोळंके यांनी दिली आहे. या अपघातामुळे काही काळ रुग्णालयात गोंधळ उडाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT