जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलेले शिक्षक. pudhari photo
बीड

Teachers hunger strike : सीटीईटी निकालापूर्वी केंद्रप्रमुख पदोन्नतीची घाई का?

शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण

पुढारी वृत्तसेवा

बीड : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रियेविरोधात शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्याची घाई का केली जात आहे, असा सवाल उपस्थित करत शिक्षक संघटनांनी आजपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख पदोन्नतीसंदर्भात प्रक्रिया सुरू केल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना तसेच सीटीईटी परीक्षेचा निकाल अद्याप लागलेला नसताना ही प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्यामुळे प्रथम सीटीईटीचा निकाल जाहीर करावा आणि त्यानंतरच नियमानुसार केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया राबवावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे.

याशिवाय टीईटी पेपर क्रमांक 1 व 2 संदर्भातील संभम दूर होईपर्यंत केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया थांबवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. 26 फेबुवारी 2026 रोजी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या पात्रता यादीत अनेक त्रुटी व चुका असल्याचा आरोप करत ही यादी तत्काळ रद्द करावी, तसेच ज्या शिक्षकांनी आक्षेप नोंदवले आहेत त्यांची सुनावणी घेऊन न्याय द्यावा, अशी मागणीही शिक्षक संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव करण्याचा इशाराही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेसमोर सुरू झालेल्या या आमरण उपोषणामुळे शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटना यांच्यातील वाद आणखी तीव होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आंदोलकांचा इशारा

सीटीईटीचा निकाल जाहीर झाल्याशिवाय आणि पात्रता यादीतील त्रुटी दुरुस्त केल्याशिवाय केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया राबवू नये. अन्यथा शिक्षक संघटना आंदोलन अधिक तीव करतील. असा ठाम इशारा आंदोलक शिक्षकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT