चोरी file photo
बीड

तामिळनाडू सोने चोरीचे बीड कनेक्शन!

Beed theft : चोरी तामिळनाडूत, चोर लातूरचे, सोन्याची विक्री बीडमध्ये

पुढारी वृत्तसेवा

बीड : काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे बीड जिल्हा चर्चेत आहे. आता तामिळनाडू राज्यातील चोरीचे सोने बीड जिल्ह्यातील नांदुरघाट येथील व्यापाऱ्याला विकल्याचा प्रकार सोमवारी (दि.१७) उघडकीस आला. तमिळनाडूचे पोलीस दोन दिवसांपासून त्या सोनाराच्या शोधात नांदुरघाट येथे तळ ठोकून असून चोरीचे सोने मिळाले; मात्र चोरीचे सोने खरेदी करणारा आरोपी घराच्या छतावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसापूर्वी तमिळनाडू राज्यातील एका सराफ दुकानातून चोरट्यांनी एक किलो दोनशे ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. ते चोरीचे सोने त्यांनी नांदुरघाट येथील सोन्याचे सराफ व्यापारी अनिल बडे याला विकले होते. या सोन्याची किंमत एक कोटींच्या घरात आहे. अनिल बडे याने चोरट्यांसोबत २५ लाख रूपयांची डील केली त्यापैकी त्याने १४ लाख रूपये चोरट्यांना दिले होते. उर्वरित ११ लाख रूपये देणे बाकी होते. तमिळनाडू पोलिसांनी या चोरीचा तपास करत लातूर येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरीचे सोने हे बीड जिल्ह्यातील नांदुर घाट येथील अनिल बडे नावाच्या सराफा व्यापाऱ्याला विकले असल्याचे सांगितले.

त्यानंतर मागील दोन दिवसांपासून तमिळनाडूचे पोलीस हे केज पोलिसांच्या मदतीने नांदुरघाट येथे सापळा लावून दबा धरून बसले होते. पोलिसांनी अनिल बडे याच्या घरावर छापा मारला असता त्यात त्याने दरोड्यातील विकत घेतलेले एक किलो सोने सापडले, मात्र चोरीचे सोने विकत घेणारा आरोपी अनिल बडे मात्र घराच्या छतावरून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाला. केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, नांदूर घाट चौकीचे पाशा शेख, राजू वंजारे, शमीम पाशा यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी तमिळनाडू पोलिसांना या प्रकरणात मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT