student death 
बीड

Beed Accident: कांद्याची ट्रॉली अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

गेवराई तालुक्यातील दुर्दैवी घटना

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : तालुक्यातील मिरगाव येथे शेतात कांदे भरत असताना ट्रॉलीचा तोल जाऊन ती अंगावर पडल्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजीत शरद पराड (रा. मिरगाव) हा उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शेतात गेला होता. दुपारच्या कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी तो शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सावलीत बसला होता. त्याचवेळी ट्रॉलीमध्ये कांदे भरण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, ट्रॉलीच्या मागील बाजूस वजन वाढल्याने समोरील भाग वर उचलला गेला. अचानक तोल जाऊन संपूर्ण ट्रॉली विश्वजीतच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मिरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT