Storm hits Ashti, Shirur talukas
आष्टी, शिरूर, पुढारी वृत्तसेवा बुधवारी सायंकाळी आष्टी व शिरूर तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला. अर्धा ते पाऊणतास वादळी वाऱ्यासह पावसाचा हा धुमाकूळ सुरू होता. यामध्ये शंभर वर्ष जुने वटवृक्ष देखील उन्मळून पडले तसेच शेकडो विजेचे खांब कोसळले. वाबरोबरच अनेक घर, गोठ्यावरील पत्रे उडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
आष्टी तालुक्यातील विविध भागात बुधवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वारे धडकले. अर्धा ते पाऊणतास हा सोसाट्याचा वारा असल्याने यामध्ये मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले. याबरोबरच ग्रामीण व शहरी भागात वीजेचे खांब कोसळले तसेच अनेक झाडांच्या फांद्या विजेच्या तारावर पडल्याने मोठे नुकसान झाले. बावी, आष्टी पिंपरी यासह इतर गावांनाहा जोरदार तहखा बसला असून अनेकांच्या घरावरील पत्रे उडून संसार उघड्या वर पडला.
विजेचे पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे तर शेती, फळबागा, जनावरे, घरे आणि इतर मालमत्ते-चेही मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्यातही वादळी वारे शिरूर कासार तालुक्यातील पूर्वभागातील मौजे फुलसांगवी, हाजीपुरगाजीपुर, मार्कडवाडी, शिरापूर गात, निमगाव लमानवाडी तांडा, ब्रम्हनाथ येळंब, पाडळी, आनंदगाव, नांदेवाली, खालापुरी तर पश्चिम भागातील पिंपळनेर, गोमळबाडा, कन्होबाचीवाडी रूपपुर, मानूर आदी गावांना बुधवार दि. ११ जून रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना करत आलेल्या पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे.
या वादळी वाऱ्यामुळे मोठमोठाली झाडे उन्मळून पडली आहेत. तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. विद्युत वितरणाच्या जागोजागी तारा तुटून, पोल पडून मोठा अडथळा निर्माण झालाआहे. रस्त्यालगतची मोठमोठाली झाडे मोडून, उन्मळून पडल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी रहदारीलाही अडथळा निर्माण झाला आहे.
अनेक ठिकाणची झाडे विद्युत वितरणाच्या तारेवरती पडल्याने काही ठिकाणी तारा तुटल्या तर काही ठिकाणी पोलही पडले यामुळे विद्युत वितरणाचा पुरताच खेळखंडोबा झाला. परिणामी गेल्या २४ तासअनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा बंद राहिल्याने मोबाईल नेटवर्कही बंद पडले होते. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बहुतांश नागरिकांचे मोबाईल गतप्राण झाले.
यामुळे गेल्या २४ तासांमध्ये जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे, अनेकांच्या घरा-वरील पत्रे उडाल्याने बेघर होण्याची वेळ आली आहे. छतावरील पत्रे उडाल्यामुळे पावसाने घरातील दैनंदिन जीवनातील घर उपयोगी साहित्य साहित्य भिजल्यामुळे अनेकांना मोठे नुकसान सहन करावे लागेल आहे. एकीकडे हा पाऊस नुकसान करणारा ठरला असला तरी या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मृगनक्षत्रामध्ये या पावसाने आता शेतामध्ये पेरणी, लागवडीला वेग आला आहे.