बीड

Kej accident news | केज-कळंब रोडवर उभ्या ट्रकला एसटीची जोरदार धडक; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

धडक इतकी जोरात होती की बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे

पुढारी वृत्तसेवा

केज : केज-कळंब रोडवरील चिंचोली पाटीजवळ आज (दि.५ मार्च) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला कोल्हापूर-माजलगाव एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एसटीचे चालक, वाहक आणि इतर १३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, परिसरात खळबळ माजली आहे.

नेमकी घटना काय?

आज सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास साळेगाव जवळील 'हॉटेल लालपरी' समोर हा अपघात घडला. कोल्हापूरहून माजलगावकडे जाणारी बस चिंचोली पाटीजवळ आली असता, रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. धडक इतकी जोरात होती की बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

देवदूत बनून धावले स्थानिक आणि पोलीस

अपघाताची माहिती मिळताच जय जोगदंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बसबाहेर काढले. रुग्णवाहिका चालक सुमित तेलंग यांनी तातडीने सर्व जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे यांनी देखील तातडीने मदतकार्य राबवले, तर पोलीस उपनिरीक्षक राकेश बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

जखमींवर उपचार सुरू

सर्व जखमींना प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी सुमित तेलंग यांच्या रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. आनंद गायके (चालक, ४० वर्षे), विष्णू तांबडे (वाहक, ४२ वर्षे), संजय खरात (३५ वर्षे), चैतन संजय खरात (१६ वर्षे), भास्कर गायकवाड (३६ वर्षे), आशा खरात (२५ वर्षे), सचिन खरात (३० वर्षे), रोशनी खरात (१८ वर्षे), भाग्यश्री गायकवाड (३० वर्षे), पायल गायकवाड (१५ वर्षे), सुनिता खरात (३२ वर्षे), सचिन सुरवसे (४५ वर्षे), वैशाली राऊत (३२ वर्षे) अशी जखमींची नावे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT