Phaltan Crime Sampada Munde Case
अविनाश मुजमुले
वडवणी: सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर या वडवणी तालुक्यातील कोठारबन (ह. मु. कवडगाव, ता. वडवणी जि. बीड) येथील आहेत. काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. याप्रकरणी माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करेल, अशी वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती. याप्रकरणी दुर्लक्ष केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती, त्यात तिने धक्कादायक आरोप केले आहेत. त्या नोटमध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी तिच्यावर पाच महिन्यांपासून वारंवार अत्याचार आणि लैंगिक शोषण केले, तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक छळ केल्याचा उल्लेख हातावरील सुसाईड नोट मध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
या घटनेने फलटण उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलिस प्रशासनात शोककळा पसरली आहे. वडवणी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पीडितेचे वडील हे बीड जिल्ह्यातील येथील रहिवासी असून शेती करतात. शेती करून मुलीचे शिक्षण पूर्ण केले होते. पीडितेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ढेकणमोहा येथे झाले. तर वैद्यकीय शिक्षण हे एमबीबीएस शिक्षण जळगाव येथे पूर्ण केले.
सातारा फलटण येथे 2022 पासून उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. पहिलीच पोस्टिंग फलटण येथे झाली होती. मृत डॉ. मुलीचे आणि वडिलाचे बोलणे दोन दिवसांपूर्वी फोनवर झाले होते. दिवाळीला घरी येण्यासाठी न्यायला येऊ का? असे वडील फोनवर म्हणाले होते. परंतु, सुट्टी मिळत नसल्याचे पीडितेने सांगितले होते. हे शेवटचे बोलणे झाले होते.
दोन वर्षांतील त्रासाला कंटाळून अखेर गुरुवारी रात्री टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने वडवणी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ एक विवाहित बहीण असा परिवार आहे. दोषींना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे
महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करून उपजिल्हा रुग्णालयातील सर्व स्टाफची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी. त्या दोन पोलीस नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे.
पीडितेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे सध्या रहिवासी असलेल्या शेतात पीडितेच्या पार्थिवावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.