डॉ. गौरी पालवे मृत्यूप्रकरणी एसआयटी नेमा; उपसभापती नीलम गो-हेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी File Photo
बीड

डॉ. गौरी पालवे मृत्यूप्रकरणी एसआयटी नेमा; उपसभापती नीलम गो-हेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तपासावर कोणताही राजकीय दबाव खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री

पुढारी वृत्तसेवा

SIT appointed in Dr. Gauri Palave's death case; Deputy Speaker Neelam gorhe demand to the Chief Minister

बीड, पुढारी वृत्तसेवा :

बीड जिल्ह्यातील डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोहे यांनी बुधवारी (दि.४) पीडितेच्या आई-वडिलांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणाची स्वतंत्र विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) उच्चस्तरीय चौकशी करावी आणि तपास महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली व्हावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

या भेटीदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाही उपस्थित होत्या. डॉ. गौरी यांच्या मृत्यू प्रकरणात तपासात गंभीर विसंगती असल्याचे डॉ. गोहे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, पोलिस तपासावर कोणाचाही दबाव नाही आणि कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

डॉ. गोन्हे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गौरीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दीर्घकाळ चाललेला मानसिक छळ आणि तणावामुळे हा मृत्यू झाला नसून, ती हत्या असू शकते, असा संशय आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलम ८५ (जुने कलम ४९८-अ) अन्वये गुन्हा दाखल असून, त्यात छळाचा स्पष्ट उल्लेख आहे.

त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी सखोल तपास गरजेचा आहे. डॉ. गौरीसारख्या उच्चशिक्षित मुलीचा असा अंत होणे ही सामाजिक वेदना आहे. अशा घटना रोखण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावरच तरुण मुलींसाठी विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य करावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी डॉ. गो-हे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT