भावाच्या लग्नाची खरेदीसाठी आलेली बहीण अपघातात ठार pudhari photo
बीड

Beed road accident : भावाच्या लग्नाची खरेदीसाठी आलेली बहीण अपघातात ठार

पोलिसांनी कंटनेर चालकाला ताब्यात घेतले

पुढारी वृत्तसेवा

बीड ः दोन दिवसांवर भावाचे लग्न आल्याने खरेदीसाठी बीडमध्ये आलेल्या महिलेचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना शहरातील साठे चौकात बुधवारी दुपारी एक वाजता घडली. ही महिला ज्या दुचाकीवरून जात होती, त्या दुचाकीला एका कंटेनरने धडक दिली. या प्रकरणी पोलिसांनी कंटनेर चालकाला ताब्यात घेतले आहे.

प्रतीक्षा रामेश्वर चौधरी (वय 45 रा. शिराळा ता. बार्शी ह.मु.क. पिंपळगाव ता. वाशी जि. धाराशिव) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रतीक्षा चौधरी यांच्या भावाचे दोन दिवसांनी लग्न असल्याने त्या बीडमध्ये भाऊ व भावजयीसोबत बुधवारी दुपारी आल्या होत्या. प्रतिक्षा चौधरी यांचा भाऊ प्रदिप गव्हाणे हा दुचाकी चालवत होता तर त्यांच्यासोबत निशा गव्हाणे या देखील होत्या. त्यांची दुचाकी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास साठेचौकातून जात असताना कंटनेरने धडक दिल्याने त्या खाली पडल्या, त्यांच्या डोक्यावरुन कंटनेरचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

या अपघातात प्रदिप गव्हाणे आणि निशा गव्हाणे हे देखील जखमी झाले. या तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्रतिक्षा चौधरी यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. प्रतिक्षा यांचा भाऊ प्रशांत गोरख गव्हाणे यांचे दि.8 मे रोजी लग्न होते. त्यासाठीच त्या माहेरी आल्या होत्या. तेथून लग्नाच्या खरेदीसाठी बीडमध्ये दुसऱ्या भावासाठी आलेल्या असताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला. अपघात घडताच साठेचौकात मोठी गर्दी जमा झाली होती. गर्दीतील काहींनी कंटनेर चालकाला चोपही दिला. यावेळी वाहतूक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

चालक मद्यधुंद अवस्थेत

सोलापूर-धुळे हायवेला बायपास झाल्याने अवजड वाहने बीड शहरात शक्यतो येत नाहीत. परंतु हा कंटनेरचालक शहरातून पुढे जात होता. शहरातील साठे चौकात दिवसभर गर्दी असते, त्यात हा कंटेनरचालक दारू पिलेला असल्याने त्याला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही, यामुळे त्याने दुचाकीला धडक दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT