Beed News | file photo
बीड

Beed News | सर्पदंशाने सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू; कोयाळ येथील दुर्दैवी घटना

Dharur snakebite incident | रात्री बहीण-भाऊ झोपेत असताना अंगावर साप आला आणि त्याने दोघांनाही दंश केला. कोयाळमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Beed News |

धारूर : धारूर तालुक्यातील कोयाळ गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सर्पदंशामुळे एका कुटुंबातील सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. ही घटना 24 मे शुक्रवार रोजी मध्यरात्री घडली.

कोयाळ गावातील प्रदीप मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला व त्याने दोघांनाही दंश केला. दंशानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत अचानक बिघडली. तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली असून, मुंडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्पदंशामुळे बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT