वाल्मीक कराडने वापरलेली 'ती'स्कॉर्पिओ एका महिलेच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.  
बीड

वाल्मीक कराडने वापरलेली 'ती'स्कॉर्पिओ एका महिलेच्या नावावर

Santosh Deshmukh murder case : गाडी केज पोलीस ठाण्याच्या आवारात

पुढारी वृत्तसेवा

केज : खंडणी प्रकरणातील आरोपी व मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याने ज्या स्कॉर्पिओतून पुणे येथील सीआयडीच्या कार्यालयात जावून आत्मसमर्पण केले. ती गाडी तपास यंत्रणेने ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याने ३१ डिसेंबर रोजी पुणे येथील सीआयडी कार्यालयात स्वतःहून हजर होत आत्मसमर्पण केले होते. दरम्यान कराड याने सीआयडीच्या कार्यालयापर्यंत ज्या स्कॉर्पिओ क्र. (एम एच-२३/ बी जी-२२३१) गाडीतून प्रवास केला. ती गाडी तपास यंत्रणेने ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. ही गाडी अनिता शिवलिंग मोराळे यांच्या नावावर असून ती शिवलिंग मोराळे हे वापरीत होते आणि ते अटकेतील संशयित आरोपी वाल्मीक कराड यांच्या संपर्कात असल्याचा संशय पोलिसांना आहे. ही गाडी केज पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT