गौतम बचुटे/केज : वाल्मीक कराड याला माकोका न्यायालयात हजर करण्यासाठी आज (दि. १५) पोलिस केज येथून प्रचंड बंदोबस्तात रवाना झाले आहेत.
खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी वाल्मीक कराडला १४ जानेवारी रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींच्या वकिलाने जामीन अर्ज सादर केल्यानंतर त्याच्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाईचा अर्ज न्यायालयात सादर केला होता. आज सकाळी ११ : ३० वाजता वाल्मीक कराडला केज पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर केज पोलीस ठाण्यात सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर बीड येथील मकोका न्यायालयात हजर करण्यासाठी दुपारी १२:३५ वाजता त्याला केज मधून प्रचंड पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आले. वाल्मीक कराड याला केज पोलीस ठाण्यातून बीडच्या दिशेने घेऊन जात असताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली दोन्ही वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह दंगल नियंत्रण पथक तैनात होते.