Sand mafia attacks Talathi with rod
बीड, पुढारी वृत्तसेवा गेवराई तालुक्यातील आहेर चिंचोली येथे कार्यरत तलाठ्यावर कार्यालयातच लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. वाळू माफियाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तलाठ्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ग्रामीण पोलिसांनी जवाब नोंदवला आहे.
विलास तपसे असे हल्ला झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. तपसे हे आहेर चिंचोली येथे कार्यरत आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांनी सिंदफणा नदीपात्रातून वाळू उपसा करण्याचे काही साहित्य जप्त केले होते. याचा राग मनात धरून संबंधित वाळूमाफिया बुधवारी दुपारी त्यांच्या आहेर चिंचोली येथील कार्यालयात आला. त्यावेळी माझे जप्त केलेले साहित्य परत करा असे तो म्हणू लागला.
यावर जप्त केलेले साहित्य असे परत करता येत नाही, असे तपसे यांनी त्याला सांगितले. याचा राग आल्याने त्या वाळू माफियाने तपसे यांच्या डोक्यात रॉड घातला तसेच मुक्का मार दिला. माझे साहित्य परत केले नाहीस तर तुला जीवे मारतो अशी धमकी देखील दिली. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपसे यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या ठिकाणी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तपसे यांची भेट घेत प्रकृतीसंदर्भात माहिती घेतली. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी तपसे यांचा जवाब नोंदवला असून रात्री कम उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला दा नव्हता. परंतु महसूल कर्मचाऱ्यावर एक अशा प्रकारे हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.