Beed accident news 
बीड

ट्रकच्या धडकेत बँक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

Beed accident news | या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई : शहरातील रिंग रोडवर तथागत चौक परिसरात आज भीषण अपघात झाला. ट्रकच्या जोरदार धडकेत स्कुटीवर जात असलेले दीनदयाळ बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुदर्शन टाक यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन टाक हे आपल्या स्कूटीवर जात असताना भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून उत्तरीय कारवाईसाठी मृतदेह स्वा.रा.ती येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड मकरंद पत्की यांच्यासह बँकेचे संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

मूळचे उजनी गावचे रहिवासी असलेले सुदर्शन टाक हे संपूर्ण बँक परिवारात मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे दीनदयाळ परिवारात हळहळ व्यक्त होऊन दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सुदर्शन टाक यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळगावी उजनी येथे सायंकाळी करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT