'सारथी' च्या दिरंगाईमुळे संशोधन धोक्यात; विद्यार्थ्यांचे आंदोलन File Photo
बीड

'सारथी' च्या दिरंगाईमुळे संशोधन धोक्यात; विद्यार्थ्यांचे आंदोलन

फेलोशिप, एचआरए रखडल्याने संशोधकांवर उपासमारीची वेळ; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Research is at risk due to delays by 'Sarathi'; Student agitation

धारूर, पुढारी वृत्तसेवा छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) प्रशासनाच्या दिरंगाई आणि मनमानी कारभाराविरोधात संशोधक विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला आहे. गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथील 'सारथी'च्या उपविभागीय कार्यालयासमोर संशोधक विद्याथ्यांनी तीव्र धरणे आंदोलन करत प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

फेलोशिप, घरभाडे भत्ता तसेच प्रगती अहवाल प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे संशोधन आणि उपजीविका दोन्ही धोक्यात आले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. संस्थेकडे निधी उपलब्ध असतानाही फेलोशिप अदा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांची केवळ आर्थिकच नव्हे, तर मानसिक कुचंबणा होत असल्याचे विद्याथ्यांनी निदर्शनास आणून दिले.

प्रशासनाकडून संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाणारी उद्धट व अपमानास्पद वागणूक, वारंवार कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार आणि कामात ठोस व पारदर्शक कार्यपद्धतीचा अभाव यांमुळे विद्याथ्यर्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सारथी प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बसत आहे. थकीत फेलोशिप व तातडीने अदा करण्यात यावेत; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रशासनाकडून लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असेही विद्याथ्यांनी स्पष्ट केले.

दिव्यांग विद्यार्थ्यांची परवड

या आंदोलनात दिव्यांग संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषतः दिव्यांग मराठा संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिप अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत, एकीकडे उपचारांचा खर्च, प्रवास आणि दैनंदिन गरजांचा अतिरिक्त भार आणि दुसरीकडे फेलोशिप नसल्याने होणारी आर्थिक ओढताण, अशा दुहेरी संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे.

आम्हाला सहानुभूती नको, हक्क हवा विद्यार्थी आहे. दिव्यांग मी दिव्यांग संशोधक असल्यामुळे उपचार, प्रवास व दैनंदिन गरजांवर अधिक खर्च होतो. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून फेलोशिप व मिळा लेला नाही. वेळेत प्रगती अहवाल सादर करूनही फाइल प्रलंबित आहे असे सांगून केवळ टाळाटाळ केली जाते. आता संशोधन करायचे की उपजीविकेसाठी झगडायचे, असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. आम्हाला सहानुभूती नको, तर सन्मानाने आमचा हक्क आणि तात्काळ फेलोशिप हवी आहे.
- आप्पा तळेकर, दिव्यांग मराठा सारथी संशोधक विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT