Rasta Roko protest at Jaykochiwadi Phata near Khamgaon Pandharpur highway
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा :
खामगाव पंढरपूर महामार्गाजवळ जायकोचीवाडी फाटा येथे दि. २१ जून २५ रोजी सकाळी १० वाजता आझाद क्रांती सेनेच्या वतिने न्याय मागण्या साठी भव्य रस्तारोको करण्यात आला.
आम्हाला प्यायला स्वच्छ पाणी का नाही ? आमच्या गावच्या शाळेला दर्जेदार शिक्षण का नाही ? शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही. गेली ३५ वर्षापासून जायकोचीवाडीचा रस्ता अद्यापपर्यंत झालेला नाही शाळेतील विद्यार्थी, अबलावृद्ध, गर्भवती महिला, यांच्यासह गावकऱ्यांना दळणवळणा साठी रस्ता नसल्यामूळे नागरिकांमध्ये चिड निर्मान झाली असून रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
रस्त्याचे काम तात्काळ सुरू न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन आझाद क्रांती सेनेच्या वतीने करण्यात येईल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला या आंदोलनामध्ये आझाद क्रांती सेना प्रमूख राजेशजी घोडे, ता. प्रमूख अशोक ढगे, किसन भिसे, उद्धव हतागळे, राहूल हिवाळे, अरूण वाकणकर, अकाश गायकवाड, संजय पिसूळे, भारत गायकवाड, गणेश कांबळे, पांडुरंग कांबळे, अशोक गायकवाड ( मन्या), सुनील कांबळे, सुनील खंडागळे, सुरेश घोडे, बप्पा सुरवसे, दादाराव थोरात, व समस्त गावकरी महिला यांची लक्षणीय उपस्थीती होते.