Ramzan Eid Celebrated with Enthusiasm in Beed District
बीड, पुढारी वृत्तसेवा रमजानचा संपूर्ण महिना उपवास केल्यानंतर शनिवारी बीड जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. बीड शहरासह गेवराई, केज, आष्टी, धारुर, अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, माजलगाव या शहरांसह ग्रामीण भागात ईदगाह मैदानावर सकाळी नमाज अदा करण्यात आली. यावेळी समाज बांधवांनी विश्वशांतीसाठी दुवा मागितली.
केज तालुक्यात मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र असा सण रमजान ईद साजरा करण्यात आला. मुस्लिम बांधवांनी नवे कपडे परिधान करून अत्यंत आनंदी वातावरणात इदगाह आणि मस्जिदमध्ये नमाज अदा केला. तसेच इष्ट मित्र आणि सर्व धर्मीय बांधवांना फराळ व शिरखुर्मा देवून एकमेकांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
नगरपरिषदेच्या स्वच्छता उपक्रमाचे कौतुक गेवराई पुढारी वृत्तसेवा : पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने, शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता गेवराई शहरातील मोंढा नाका परिसरातील ईदगाह मैदानावर भक्तिभावात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून, विश्वशांतीसाठी अल्लाह कडे दुवा केली.
गेवराई शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर प्रार्थनेसाठी गर्दी केली होती. नमाजनंतर एकत्रितपणे देशात व जगात सुख शांती नांदावी यासाठी विशेष दुवा करण्यात आली. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, गेवराई नगर परिषदेच्या वतीने ईदगाह मैदानावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. येथील परिसर स्वच्छ करण्यात आल्याने, धर्मगुरू मौलाना मुफ्ती साहब, अॅड अब्बास शेख, माजी नगरसेवक सय्यद इजार सेट, ज्येष्ठ पत्रकार अय्युब बागवान यांनी समाजाच्या वतीने नप प्रशासनाचे, तसेच बाळराजे पवार यांचे आभार मानले.
ईदगाह मैदानावर उपस्थित राहून माजीमंत्री बदामराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, भाजप नेते बाळराजे पवार, युवा नेते युद्धाजित पंडित, रोहित पंडित, गेवराई नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड. भगवान मुंबार्डे, अॅड. राजेंद्र राक्षसभुवनकर, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, शिवराज पवार, राहुल खंडागळे, लक्ष्मण राऊत, भरत गायकवाड, किशोर धोंडलकर, सभापती महेश सौंदरमल, यशराज पंडित, रणवीर पंडित आदींसह अनेक मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संदीप खोमणे, डीवायएसपी अनिल कटके, ना. तहसिलदार संजय सोनवणे, यांच्यासह पोलीस व महसूल विभागातील अधिकारी, राजेंद्र मोटे, अण्णासाहेब राठोड, किशोर कांडेकर, माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, ऋषिकेश बेदरे, संजय काळे, पप्पू गायकवाड, अमोल करांडे, जालिंदर पिसाळ, दादासाहेब घोडके, नगरसेवक आप्पासाहेब कनगुडे, यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईदच्या या पवित्र प्रसंगी समाजात बंधुभाव, एकता आणि सौहार्द टिकवण्याचा संदेश देण्यात आला. नमाज आणि दुवामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
ईदगाह मैदानाची स्वच्छता मोहीम
गेवराईच्या ईदगाह मैदानावर नगर परिषदेच्या वतीने ईद सणाच्या दोन दिवस आधी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदरील परिसर स्वच्छ करण्यात आला. आजूबाजूला असलेले गाजर गवत, काटेरी झाडे-झुडपे काढून नमाज पठणाचा परिसर पाण्याने स्वच्छ धुवून काढण्यात आला. नगर परिषदेच्या या स्वच्छता मोहिमेचे मुस्लिम समाजाच्या वतीने मौलाना मुफ्ती साहब, ज्येष्ठ पत्रकार अय्युब बागवान यांनी नगर परिषद प्रशासन तसेच युवा नेते बाळराजे पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.