बदलापूर घटनेच्या निषेधार्थ तोंडावर काळीपट्टी बांधून भरली शाळा Pudhari Photo
बीड

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ तोंडावर काळीपट्टी बांधून भरली शाळा

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा

बदलापूर येथील शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचार घटनेनंतर सर्व स्तरात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील अभिनव विद्यालय या शाळेत आज शालेय विद्यार्थिनींनी तोंडावर काळीपट्टी बांधत या घटनेचा निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला सुरक्षेचा विषय गांभीर्याने घ्यावा अशी मागणी शाळेतील विद्यार्थिनी व महिला शिक्षिकांनी केली.

बदलापूर येथील एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या घटनेच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने सर्व स्तरातून प्रतिक्रिया व पडसाद उमटत आहेत. याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील अभिनव विद्यालय या शाळेतील महिला शिक्षकांनी पुढाकार घेत शाळेतील विद्यार्थिनीसह या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्‍यासाठी आज संपूर्ण दिवसाची शाळा ही तोंडावर काळीपट्टी बांधून निषेध दर्शविणारी भरवली.

त्याचबरोबर महिला सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने गंभीर उपाययोजना कराव्या यासाठी विद्यार्थिनींच्या भावना व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचेही आयोजन या शाळेत करण्यात आलं होतं. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शाळकरी मुलींनी अतिशय गंभीरपणाने आपापल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी या निषेध आंदोलनात शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT