शिक्षकाकडून लाच घेताना मुख्याध्यापक 'एसीबी'च्या जाळ्यात  Pudhari File Photo
बीड

बीड : शिक्षकाकडून लाच घेताना मुख्याध्यापक 'एसीबी'च्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

बीड, पुढारी वृत्तसेवा : वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी मुख्याध्यापकाने शिक्षकाकडे लाचेची मागणी केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणात 2 हजार 700 रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापकाला एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई पंचायत समिती ट्रॅपची आठवड्यातली ही दुसरी घटना आहे.

भारत शेषेराव येडे (वय.57, रा. मण्यारवाडी ता. गेवराई) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. 2 हजार 700 रुपयांची लाच स्विकारताना गेवराई शहरातील हॉटेल सोमवारी (दि.29) रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार हे शिक्षक आहेत. त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ अटी व शर्ती नुसार मान्य केले. संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांनी वरिष्ठ श्रेणी देय आहे किंवा कसे असे पत्र काढले होते.

तक्रारदार यांचे वरील वरिष्ठ श्रेणीचे बिल तयार करून ते बील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गेवराई आणि जिल्हा परिषद बीड येथून मंजूर करून देण्यासाठी एकूण बिलाची रक्कम 27 हजार रुपयांचे 10 टक्क्यांची लाचेची मागणी केली. लाच स्विकारताना मुख्याध्यापकास यावेळी भारत येडे यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीड पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी शेख युनूस, सह सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड, पोलीस अंमलदार, सुरेश सांगळे, भरत गारदे, अविनाश गवळी, अंबादास पुरी, निकाळजे, गणेश मेहेत्रे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT