Beed News : आजबेंनी जिभेला आवर घालावा : प्राजक्ता धस file photo
बीड

Beed News : आजबेंनी जिभेला आवर घालावा : प्राजक्ता धस

'भाऊसाहेब आजबेंचे वारस असाल तर आरोप सिद्ध करा'; जमिनीच्या आरोपांवरून आष्टीत राजकीय संघर्ष पेटला

पुढारी वृत्तसेवा

Political conflict flares up in Ashti over land-related allegations

आष्टी, पुढारी वृत्तसेवा: आष्टी तालुक्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या राजकीय संघर्षाला आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांची धार आली आहे. माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी दुष्काळी मोर्चात केलेल्या आरोपांना महानंदच्या संचालिका प्राजक्ता धस यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. "मॅडमला आवरा, असे म्हणणाऱ्या बाळासाहेब आजबेंनीच आधी जिभेला आवर घालावा. माझ्यावर केलेले आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावेत; अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू," असा इशारा प्राजक्ता धस यांनी दिला.

माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली आष्टी-पाटोदा-शिरूर तालुक्यातील दुष्काळी प्रश्नांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात दुष्काळ, पाणी, दूध उत्पादक शेतकरी आणि अन्य मागण्यांसोबतच प्राजक्ता धस यांच्यावर काही आरोप करण्यात आल्याचा दावा धस यांनी केला.

त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी आजबेंवर जोरदार पलटवार केला. प्राजक्ता धस म्हणाल्या, "दुष्काळी मोर्चा काढला, तर त्यात शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर, दूध उत्पादकांच्या प्रश्नावर चर्चा व्हायला हवी होती. मात्र, बाळासाहेब आजबे यांनी 'मॅडमला आवरा' असे म्हणत माझ्या चारुियावर आणि जमिनीच्या व्यवहारांवर आरोप केले. पिंपळा, पुंडी, पांढरी, सोलेवाडी, तवलवाडी, इमनगाव, हनुमंतगाव, शिदेवाडी, शिराळ, चिंचपूर आणि आष्टी परिसरात माझ्या जमिनी असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी हे आरोप पुराव्यासह सिद्ध करावेत. "आरोपांना उत्तर देताना प्राजक्ता धस यांनी संबंधित जमिनींच्या कागदपत्रांचा थेट उल्लेख केला. "आजबेंनी उल्लेख केलेल्या गावांपैकी कोणत्याही गावातील माझ्या नावावरील नोटरी, साठेखत, खरेदीखत किंवा सातबारा असल्यास तो त्यांनी जनतेसमोर दाखवावा," असे खुले आव्हान त्यांनी दिले.

पुंडी येथील जमीन सन २०१२ मध्ये खरेदी केल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, संबंधित सर्व जमिनींचा निवडणूक शपथपत्रात उल्लेख करण्यात आला आहे. आपण दुग्ध व्यवसायासह नोंदणीकृत कंपन्यांच्या माध्यमातून व्यवसाय करीत असून त्याचा आयकर विवरणपत्राद्वारे हिशेब दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हनुमंतगाव आणि शिदेवाडी येथील जमिनींच्या उल्लेखावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. "हनुमंतगाव येथील देशमुखांची जमीन आणि शिदेवाडी येथील काझी कंपनीची जमीन वतनदारांची आहे. माझा या जमिनींशी विनाकारण संबंध जोडला जात आहे," असे त्यांनी सांगितले.

भीमराव धोंडे यांचे कार्यकर्ते हेमंत मेहर यांच्याशी संबंधित जमिनीच्या वादाचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बाजूंचे लोक आपल्याकडे आल्यानंतर जमीन मोजून घेऊन वाद मिटवावा, जमीन विक्री करू नये, असा सल्ला आपण दिला होता. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजबे यांच्यावर पलटवार करताना प्राजक्ता धस यांनी त्यांच्या नैतिकतेवरही प्रश्न उपस्थित केला. "पाच टर्म आमदार राहिलेल्या माझ्या पर्तीचा मला नैतिक धाक आहे. त्यामुळे मला कोणाला आवरण्याची गरज नाही. तुमची नैतिकता काय आहे, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. योग्य वेळी ते जनतेसमोर आणू," असा इशाराही त्यांनी दिला.

आजबे यांच्या आरोपांचा आता अतिरेक झाला असून, त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, "भाऊसाहेब आजबे यांचे वारस असाल तर माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवा," असे आव्हान देत त्यांनी राजकीय संघर्ष आणखी तीव्र केला आहे. आष्टी-पाटोदा- शिरूर परिसरातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून सुरू झालेल्या आंदोलनाला आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची किनार लागली आहे. एका बाजूला दुष्काळी प्रश्नांवरून सरकारकडे मागण्यांचा रेटा सुरू असताना दुसरीकडे स्थानिक राजकारणात वैयक्तिक आरोपांवरून वातावरण तापले आहे. प्राजक्ता धस यांच्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे आगामी काळात आजबे यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय

मॅडमला आवरा'; प्राजक्ता धस यांच्यावर आजबेंचे आरोप

माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी दुष्काळी मोर्चादरम्यान आमदार सुरेश धस यांच्या पत्नी तथा महानंदच्या संचालिका प्राजक्ता धस यांच्यावर गंभीर आरोप केले. 'मॅडमला आवरा' असे म्हणत त्यांनी त्यांच्या चारित्र्यावर तसेच जमिनीच्या व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केला होता. प्राजक्ता धस यांनी केला आहे. पिंपळा, पुंडी, पांढरी, सोलेवाडी, तवलवाडी, इमनगाव, हनुमंतगाव, शिंदेवाडी, शिराळ, चिंचपूर आणि आष्टी परिसरात जमीन असल्याचा आरोप आजबेंनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT