गेवराईत गांजा विक्रीवर पोलिसांचा छापा; २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक file photo
बीड

Ganja Sale : गेवराईत गांजा विक्रीवर पोलिसांचा छापा; २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

सिरसदेवी येथे एक इसम गांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

पुढारी वृत्तसेवा

Police Raid on Ganja Sale in Gevrai; Contraband Worth ₹2.66 Lakh Seized, One Arrested

गेवराई, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सिरसदेवी येथे गांजा बाळगून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखा व तलवडा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत २ लाख ६६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिरसदेवी येथे एक इसम गांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व तलवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने सिरसदेवी येथे छापा टाकला.

या कारवाईदरम्यान शेख रईस शेख युसूफ (वय २५, रा. सिरसदेवी) याच्या घराची झडती घेतली असता ८ किलो ८८८ ग्रॅम वजनाचा गांजा, अंदाजे २,६६,६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पथकात नायब तहसीलदार गजानन मोरे, सपोनि संतोष जंजाळ पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार आनंद मस्के, विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, बबन सलगर, अतुल हराळे, सुधीर जोशी तसेच तलवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT