Beed Crime News 
बीड

Beed Crime News | अंबाजोगाईत हॉटेलवर पोलिसांचा छापा; 'तिर्रट' जुगाराचा डाव उधळला, ६ जणांना अटक

या कारवाईत एकूण ४ लाख ७३ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई: शहरातील कारखाना रोडवरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी गुरुवारी (दि. २) मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात सहा जुगारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, त्यांच्याकडून ४ लाख ७३ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अंबा सहकारी साखर कारखाना रोडवरील 'हॉटेल' परिसरात काही इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने सदर हॉटेलवर अचानक छापा टाकला. यावेळी सहा जण गोलाकार बसून पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळताना रंगेहात मिळून आले.

अटकेतील आरोपींची नावे अशी

पोलिसांनी या कारवाईत मोहम्मद खतीब (वय ५०, रा. खतिब गल्ली), सद्दाम बागवान (वय ३०, रा. बागवान गल्ली), शेख अजहर जिलानी (वय ४८, रा. खतिब गल्ली), श्रीराम बारगजे (वय ३९, रा. रायगडनगर), नागनाथ ढगे (वय २२, रा. रायगडनगर) आणि धर्मराज वाघमारे (वय ३९, रा. मोरेवाडी) यांना ताब्यात घेतले आहे.

पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ११ हजार ६७० रुपये रोख, १ लाख ३७ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि ३ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकल, असा एकूण ४ लाख ७३ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हा दाखल आणि तपास

या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२५/२०२६ नुसार, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोउपनि आनंद शिंदे व त्यांच्या पथकाने यशस्वी केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विजयसिंग गायकवाड करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT