केजमध्ये मटका बुक्यांवर छापे File Photo
बीड

Beed News : केजमध्ये मटका बुक्यांवर छापे; २४ हजाराचा मुद्देमाल जप्त

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

केज : केज पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील तीन मटका बुक्यांवर छापे मारून २४ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

केज पोलिस ठाण्याचे फौजदार लक्ष्मण कीर्तने, फौजदार बाळासाहेब रोडे, जमादार बाळासाहेब अहंकारे, पोलीस नाईक शिवाजी कागदे, त्रिंबक सोपणे यांच्या पथकाने मंगळवारी (दि.२३) दुपारी १.५० वाजेच्या सुमारास कळंब रस्त्यावरील पटेल हॉटेलच्या बाजूला कल्याण मटका घेणाऱ्या आसेफ ईसाक शेख (रा. क्रांतीनगर, केज) याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडील मटक्याच्या चिठ्या, नगदी एक हजार २५० रुपये, १८ हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला. त्याचबरोबर या पथकाने उमरी रस्त्यावरील वेदांत हॉटेलच्या कल्याण मटका घेणाऱ्या लियाकत इस्माईल शेख (रा. फुलेनगर, केज) याला ताब्यात घेत त्याच्याकडील मटक्याच्या चिठ्या, दहा हजार रुपायांचा मोबाईल, नगदी ९१० रुपये जप्त केले. तर स्थानिक गुन्हे शाखेचे जमादार भागवत शेलार, जमादार दिलीप गित्ते, खांडेकर यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी १.५० वाजेच्या सुमारास उमरी रस्त्यावरील बाळूमामा मंदिराजवळ मटका घेणाऱ्या महेश दादाराव लांडगे (रा. उमरी रोड, केज) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे मटक्याच्या चिठ्या व नगदी ४ हजार तीनशे रुपये मिळून आले. याप्रकरणी महेश लांडगे, आसेफ शेख, डापकर, लियाकत शेख, शहाजी भगवान मुळे (रा.परंडा) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT