केज : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे आज दि. २१ डिसेंबर रोजी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी येत असल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त देण्यात करण्यात आलेला आहे.
पवार यांच्यासोबत खा. बजरंग सोनवणे, खा. निलेश लंके यांच्यासह आ. संदीप क्षीरसागर हे उपस्थित राहणार आहेत. शरद पवार हे हेलिकॉप्टरने येत असल्याने केज-मांजरसुंबा रोडवर मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या जवळ हेलिपॅड तयार करण्यात आले आहे.
दरम्यान शरद पवार आणि त्यांच्या सोबत इत्तर महत्वाचे अनेकजण येणार असल्याने मस्साजोग कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक अप्पर पोलीस अधीक्षक, दोन पोलीस अधीक्षक, चार पोलीस निरीक्षक, एस आर सी एफच्या दोन तुकड्या, आर सी पी ची तुकडी, १२५ पुरुष पोलीस अंमलदार, २५ महिला पोलीस अंमलदार असा प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच महामार्गावरची वाहतूक देखील वळविण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून समजते आहे.